सध्या महाराष्ट्रातील युवा शेतकरी जोडधंदा म्हणून गिर गायींच्या पाठीमागे भरधाव पळतोय. युट्यूब वर गुजरात, राजस्थान चे गिर गायींचे, गोशाळांचे अतिशय मोहक विडीओ पहायला मिळतात. त्या गायींचा दिसाळूपणा, त्यांच दूध आणि त्याबद्दल चे वेगवेगळे दावे, वेगवेगळे समज-गैरसमज यांमुळे आपला युवक धडाडून उठतो आणि ठरवतो की मला गिर गायी करायच्या आहेत. एवढ्या रूपयांनी दूध जातं, तेवढ्या रूपयांनी तुप जातं असे हिशोब लावायला लागतो. मी सुद्धा यातलाच होतो. अजूनही बऱ्याच जणांना वाटत असेल. पण एकदा माझा अनुभव ऐकून घ्या. मग करा तुम्हाला काय ठिक वाटेल ते.
मुळात ही गिर गाय काय आहे, ही महाराष्ट्रात कुठून आली, हिचा महाराष्ट्रात एवढा प्रचार कसाकाय झाला हे सगळं जाणून घ्या.
अंदाजे 10-20 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गिर गाय होती का हो?🤔नाही ना. मग कशीकाय एवढ्या प्रमाणात आली. ते म्हणतात ना 'बिझनेस करणा और अपनी चिजों को खपाना कोई गुजरातीयोंसे सिखें'. या म्हणीतच मुळ दडलेलं आहे. नवीन नवीन या गायींचे फीरतीवरचे कळप महाराष्ट्रात आले. आणि या कळपांबरोबरच काही समज ही आले.सुरूवातीला ही गाय कृष्णा गाय किंवा कृष्णाची गाय म्हणून प्रचलित झाली किंवा केली गेली. त्याबरोबरच या गायीचं दूध खुप महाग आहे कारण ते खुप चांगल असतं, तुप खुप महाग आहे कारण ते खुप स्वादिष्ट व पौष्टिक असतं, गौमुत्र फार मौल्यवान आहे कारण हि गाय एक देवाचं किंवा कृष्णाचं रूप आहे आणि म्हणून ते इतर गायींपेक्षा खूप पवित्र आहे. असे समज ही हळूहळू पसरत गेले. या गोष्टींबरोबरच ही गाय सुद्धा महाराष्ट्रभर पसरू लागली. काही काळानंतर हिच्या दूधाच्या पौष्टिकतेची शास्त्रीय कारणे ही सांगण्यात येऊ लागली. त्यात सर्वात मोठं कारण म्हणजे गिरचे दूध हे a2 दूध आहे आणि ते माणवी शरीरास अतिशय चांगले आहे असं सांगून मार्केटिंग केलं जाऊ लागलं. तसं पाहिलं तर शास्त्रज्ञांच्या मते a2 दूध खरोखरच शरीरास पोषक आहे. या दूधाची गुणवत्ता संकरित गायींच्या दूधापेक्षा चांगलीच आहे. पण हे a2 दूध फक्त गिर गायींमध्येच आहे हे साफ खोटं आहे. भारतात जेवढ्या देशी गायी आहेत जसं की, महाराष्ट्रीयन खिलार, देवणी,म्हैसूर, कंधार,पंजाब हरियाणा ची राठी, थारपारखर, साहिवाल, दक्षिणेकडील ब्राह्मण, डांगी, राजस्थान गुजरात ची गिर, कांकरेज, काठियावाडी इतकच काय म्हशींमध्ये सुद्धा a2 दूध आहे. या सर्व देशी गायींमध्ये a2 दूध आहे. या सर्व गायींच्या तुपाची गुणवत्ता तितकीच चांगली आहे. पण फक्त गिर गायीचेच तूप 2 हजार, 2.5 हजार च्या भावात विकलं जातं. फक्त गिर गायींचच दूध 100 रूपयांपर्यंत विकलं जातं(काही ठिकाणी). याच कारण हिचा झालेला प्रचार आणि हिच्याबद्दल चे समज हे आहे. असो. आता देशी गाय म्हंटलं कि आपल्या दारासमोरच्या, महाराष्ट्राच्या मुळच्या, मातीतल्या, गायींकडे न बघता गिर गायींकडे लोकं पाहू लागली. कोणी दूध, तूप विकुन पैसे कमावण्यासाठी, कोणी सेवेसाठी तर कोणी घरी दूध खाण्यासाठी म्हणून गिर गायींची मागणी करू लागला आणि मागणीतून महाराष्ट्रात तयार झाले मोठमोठे व्यापारी, मोठमोठे डिलर्स आणि मोठमोठे 'ठग'.
आता बैलांची संपत चाललेली गरज, आपल्या गायींमधली दूधाची कमतरता आणि महाराष्ट्रातली गिर गायींची वाढती हवा व क्रेज यांमुळे आपल्या गायींच मार्केट अतिशय वेगात पडलं आणि गिरच मार्केट अतिशय वेगात चढलं. आणि याच हवेत मला पण गिर गायींच वेढ लागलं.
साधारण 2 वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे.पैशाच्या अडचणी मुळे मला थोडा वेळ होता पण माझे पाहूणे ही गिर घेणार होते. मी ही आता गिर गायी बघत फीरत होतो. कारखान्यावर इकडे तिकडे जायचो. पण पुन्हा समजले की लातूर ला शनिवारी जनावरांच्या बाजारात गिर गायी येतात.आम्ही त्या ठिकाणी गेलो एक गाय पसंत केली.मुस्लिम व्यापारी होता तो. एक गोंडस कालवड या गायीची आहे अस त्याने सांगितलं. दूध 16 लीटर सांगितलं. कुठून आली तर गुजरात हून आनली म्हणून सांगितलं. भावनगर ची ब्लडलाइन आहे, ह्यांव आहे, त्यांव आहे म्हणून सांगितलं. किंमत विचारता 85 हजार सांगितले. पण आम्हाला जास्त नाही वाटले. कारण आमच्या डोक्यात हिशोब चालूच होता '🤔एवढ दूध या भावाने जरी गेलं, तेवढं तूप त्या भावाने जरी गेलं' असा हिशोब चालू होता. मग ती गाय शेवटी 72 हजार ला ठरली. त्याच्या इथे दूध काढलं साठवलेलं असल्याने भरपूर निघालं. पैसे दिले. गाय पाहुण्यांच्या घरी आनली.
दुसऱ्या दिवशी पासुन वारसाला 1 थन देऊन गायीचे दूध एका वेळी 4 लीटर निघू लागले. त्यात दूधाचा दर वाटत होता त्यापेक्षा फार कमी मिळत होता.तरी 40 रू लीटर प्रमाणे मिळत होते. 7-8 लीटर दिवसाला निघायचे तर 5 लीटर चेच कस्टमर असल्याने बाकीचे दूध डेअरी ला 28 रुपये प्रमाणे जाऊ लागले. पण गायीचा दिवसाचा खुराकावरचा खर्च, तिचा चारा व आपली मेहनत याचा विचार केला तर काहीच पडत नव्हतं. वर त्या 72 हजार चा विचार करता त्यांना खूप टेंशन यायचं. पुढे चालून कंटाळून त्यांनी गायीवरचं लक्ष कमी केलं व तिचं जेवढ काही दूध निघायचं ते डेअरी ला देऊ लागले. आता 4-5 महिने झाले त्याआगोदरचे व्यायलेले 15-20 दिवस असे गायीला 5 एक महिने झाले होते. गाय दूधाला अजून कमीवर आली होती. पण गाभणच राहत नव्हती. आणि खाली कालवड असल्याने तिच्याकडे पाहून त्यांना विकावी ही वाटत नव्हती. अश्या पद्धतीने हा प्लॅन पूर्णपणे फसला होता.
त्यांच्यासोबत असं झाल्याने मी शांत झालो होतो. पण एक विचार डोक्यात टिकटिक करत होता कि जर या गायी अश्या असतात तर ते युट्यूब वर बघितलेले विडीओज? त्या गोशाळा, ते मोठमोठे गोठे? आणि मग ठरवलं की आता गुजरात ला जायचं आणि या गिर गायींची पूर्ण माहितीच घ्यायची.
युट्यूब वर सुरत च्या काही गोशाळा बघितल्या होत्या. त्यामुळे मी माझा एक मित्र सोबत घेऊन सुरत ला गेलो. सहजानंद गिर गोशाळेसारख्या बऱ्याच ठिकाणी गेलो. भरपूर गायी पाहिल्या. एका ठिकाणी आम्हाला एक 'गुलाबभाई' म्हणून चांगला माणूस भेटला. त्यांच्याकडे ही भरपूर गायी होत्या. त्यांना आम्ही विचारलं 'की 15-16 लीटर दूध देणारी चांगली गाय कितीपर्यंत मिळेल?' तो हसला आणि म्हणाला 'चांगली गाय कोणी का विकेल?' बस्स एवढ्यातच आमच्या डोक्यात प्रकाश पडला. पुढे त्याने सांगितले की 'इथे आम्ही गिर गायींच दूध 100 रूपये लीटर ने विकतो. अर्थातच 16 लीटर दूध देणारी गाय दिवसाला 1600 रूपये कमावते. जर ती गाय 4 महीने जरी 16 लीटर प्रति दिवस देत असेल तर ती 4 महीन्यातच 1 लाख 92 हजार रूपयांच दूध देते. तिच्यावर महीना 10 हजार जरी खर्च होत असेल तरी फक्त 4 महीने चा तिचा निव्वळ नफा किमान 1.50 लाख रुपये असनार. मग ही गाय मी तुम्हाला 3 लाखाला जरी मागितली तरी का देईन? जर ती एका वेताच्या फक्त 4 महिन्यातच माझ्या खिशात 1.5 लाख टाकत असेल तर?'
त्यांच बोलनं ऐकून आम्ही सुन्न झालो. पुढे आम्ही त्यांना विचारलं की ' मग हे आमच्याकडे महाराष्ट्रात तुमच्यातून ज्या गायी येतात त्यांच काय? ते म्हणाले की 'बरोबर आहे. तुमच्याकडे आजकाल जरा जास्तच चालू आहे गिरचं. माझ्याकडे ही काही लोकं येतात तिकडून. आणि ते इकडून 30-30 हजारात गायी घेऊन जातात. तिकडे नफा करून विकतात. पण त्यातल्या जास्त गायी चुकिच्याच असतात. काही गायी दूधाळ नसतात, काही गायींचे 1-1, 2-2 थन बंद झालेले असतात, काही गायी धारेच्या वेळी लाथा मारणाऱ्या असतात, तर काही गायी वेळेवर गाभण राहत नाहीत म्हणजेच भाकड काळ जास्त आहे म्हणून विकलेल्या असतात'. त्यांनी सांगितलं की 'गुजरात मध्ये गोशाळांवाले तर चांगली गाय कधीच विकत नाहीत.आणि आग्रहाखातर एखादी विकत असतील तर तुम्हाला लाखांवर पैसे मोजावे लागतील. इथे चांगली गाय घ्यायची असेल तर इथे काही दिवस राहावं लागतं, इथल्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या ज्यांनी काही अडचणीमुळे गाय विकायला काढली आहे अशा खात्राहू गायी दूध काढून घ्यायच्या. त्याही अशा गायी घ्यायच्या ज्या 4-5-6 महिन्याच्या गाभण ही असाव्यात आणि 2 किंवा निदान 1 टाइम तरी दूध देणाऱ्या असाव्यात जेणेकरून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टींची खात्री पटते. 1 म्हणजे ती शांतपणे दूध काढू देते का, 2 म्हणजे तीचे चारी थन चालू आहेत का, आणि 3 म्हणजे ती 5-6 महिन्याची गाभण असुनही ही 1 टाइम का असेना दूध देते म्हणजे तीचा भाकड काळ कमी आहे. आणि घेण्याआधी तुमच्या प्रोडक्टची,गोशाळे� ��ी मार्केटिंग करणे.आपल्या दूधाच्या प्युअरिटीची खाञी पटवून देऊन चांगला भाव देणारे पक्के कस्टमर तयार करणे. आणि महत्वाचे म्हणजे एखाद्या गायीत तोटा झालाच तर सहन करण्याची ताकद ठेवणे. अजून महत्वाच म्हणजे गोठ्याच नियोजन व्यवस्थित करणे. हे सगळं आम्हाला जमलं म्हणून आम्हाला परवडतं. बाकी कुठं युट्यूब वर विडीओ बघून, फलान्या फलान्या ची यशोगाथा बघून वगैरे काही होत नाही. ह्या सगळ्या यशोगाथांमधल्या अर्ध्या तर भामट्या गप्पाच असतात'.
गुलाबभाईंचे हे शब्द खरच खूप मौल्यवान होते. वेळ जास्त नव्हता.त्यामुळे त्यांचे शब्द कानात व डोक्यात साठवून परत आलो. आणि आपल्याकडच्या भामट्या व्यापाऱ्यांचा नाद सोडून दिला. जेंव्हा ही कधी मला गिर गाय घ्यावीशी वाटेल तेंव्हा मी वरील सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप आमलात आणेन.तुम्ही सुद्धा आधी 1-2 अशा गायी घेऊन गोठ्याच नियोजन, आपल्या वस्तूंच मार्केटिंग आधी करा. बघा आधी त्या गायीचं दूध चांगल्या भावाने स्थिरपणे मागितलं जातय का आणि मगच गायींची संख्या वाढवा. आणि हो भलेही सुरूवातीला दूध विक्री कमी होईल पण गायी तपासणी करून दूध काढून अशा घ्या ज्या निदान 4 महीन्याच्या गाभण असुनही दूध देत असाव्यात. जेणेकरून चुकीची गाय भेटणार नाही. सहसा अशा गायी कोणीही विकत. तुम्ही बघत असाल बरेच लोक आपल्याकडे भरपूर गायी असुनही कुण्यातरी एकाच गायीचे फोटो टाकतात. कारण एक तर त्या गायीचा भाकड काळ जास्त असतो किंवा दुसरी काही तरी खोड असते. त्यामुळे अशा लोकांना बळी पडू नका. 🙏🏼