🙏 सुनिल हिवरकर 🙏
मी 4 /9 /2019 ला झुकिनी लागवड केली. लागवड करताना पहिल्यांदा बेड काढून त्यावरती बेसल डोस भरला. त्यामध्ये कंपोस्ट खत(FYM), निंबोळी पेंड, रॉक फॉस्फेट(गोल्ड माईन), आर. पी. एस. ग्रॅन्युल्स इत्यादी खते वापरली.
नर्सरीतून(के. व्ही. के. बारामती ) रोपे आल्यानंतर पहिल्यांदा त्यावरती आरपीएस- 76. 1ml पर लि. व इम्युनोरीच 1ml पर लि. ( फक्त २ लि. पाणी) याप्रमाणे फवारले, त्याचे कारण म्हणजे आर पी एस 76 मुळे रोपांवर वाहतुक व हवामान बदलाचा येणारा ट्रेस कमी होतो व रोपांची रोग प्रतिकार शक्ती वाढते. इम्युनोरीच हे सेंद्रिय कीटकनाशक असून ते रोपांची पाने पूर्णपणे कडू करून टाकते. त्यामुळे रोपांवर कोणतेही कीड येत नाही. रोपे लागवड करताना ती पहिल्यांदा आर पी एस 76 व सॉईल गार्ड याचे एका टबमध्ये पाणी करून रोपे बुडवून लागण केली. यामुळे रोप लवकर सेट होऊन रोपांची मर होत नाही, कोणताही मूळकूज व बुरशी लवकर येत नाही. रोपे लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिकट सापळे लावले. चार दिवसांनी आरपीएस 76 व सॉईल गार्ड यांची ड्रिंचींग केली. लागवडीनंतर इम्युनोरीच पहिला स्प्रे १० व्या दिवशी , दुसरा नीमतेलचा १८ व्या आणि पुन्हा २४ व्या दिवशी इम्युनोरीचचा स्प्रे घेतला. रोप लागवड केल्यानंतर विसाव्या दिवशी बॕक्टोरीच(६ प्रकारचे जीवाणू ) व आरपीएस 76 ड्रिप मधून सोडले. आज फक्त २५ वा दिवस आहे .